Ad will apear here
Next
नमामि मातृ नर्मदे
नर्मदा नदीची पायी परिक्रमा करण्याची अनेक जणांना इच्छा असते. पण दीर्घ कालावधी आणि मार्गातील अडचणींबद्दल शंका असते. या शंकांचे निरसन मधुकर संत यांच्या ‘नमामि मातृ नर्मदे’ या पुस्तकातून होते.

लेखक, त्यांचे बंधू, बहीण, मेव्हणे या साठीच्या आसपास असलेल्या चौघांनी तीन हजार किलोमीटरची ही परिक्रमा १३३ दिवसांत पूर्ण केली. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर येथून प्रारंभ केल्यापासून परिक्रमेतील प्रत्येक दिवसाची रोजनिशी यात दिली आहे. परिक्रमेतील नर्मदामैयाचे महत्त्व यातून सांगत तिच्या सहवासातील अनुभव कथन केले आहे.

परिक्रमेतील सांकेतिक शब्द, मार्गात भेटणारे साधू महाराज, त्यांचे आदरातिथ्य, सामान्यांना कळणारी आस्था कळते. मार्गात अगदी पाय दुखण्यापासून आलेले अनेक अडथळे, संकटे व मैयाच्या ओढीने त्यावर केलेली मात याबाबत वाचताना वाचकांच्या मनातही परिक्रमेबद्दल कुतूहल निर्माण होते. तारीख व वर असलेल्या या रोजनिशीत रोजचा दिवस, निघण्याचे ठिकाण व वेळ, त्या दिवसात कापलेले अंतर व लागेल कालावधी, पोहोचण्याचे ठिकाण व वेळ, पहिल्या दिवसापासून चाललेले अंतर याचीही नोंद दिली आहे.



करवीर तालुक्यातील (जि. कोल्हापूर) उजळाईवाडी येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे सार्वजनिक ग्रंथालयाने २०१५-१६ सालच्या उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती ग्रंथ पुरस्कारासाठी ‘नमामि मातृ नर्मदे’ या पुस्तकाची निवड प्रवासवर्णन या प्रकारात केली होती. हा पुरस्कार बिहारचे तत्कालीन राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला होता.       

पुस्तक : नमामि मातृ नर्मदे
लेखक : मधुकर संत
प्रकाशक : मयुरेश मधुकर संत
पाने : ३६७
किंमत : ३५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZKFBW
Similar Posts
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही
महाभारत - पहिला इतिहास केवळ भारताचा नव्हे, तर साऱ्या जगाचाच आरसा असलेले महाभारत पुन्हा पुन्हा वाचले, तरी नवी दृष्टी देऊन जाते. वि. ग. कानिटकर यांनी या पुस्तकात महाभारताची कथा रसाळ वर्णिली आहे. सर्व रसांचा समुच्चय असलेले महाभारत मानवी मने, भावभावना, नातेसंबंध, हिंसा आणि शांती आदींचे दर्शन घडवते. कानिटकर यांनी आदिपर्व, सभापर्व,
सोळा संस्कार- का आणि कसे + व्रतवैकल्ये कोणी- कोणती-का करावी? जीवन समृद्ध होण्यासाठी मनावर आणि बुद्धीवर संस्कार होणे आवश्यक असते. आर्य वैदिक धर्मात त्यासाठी १६ संस्कार कोणते, त्यांचे स्वरूप काय, त्याचा हेतू काय याची माहिती वेदमूर्ती श्रीकांत चितळे गुरुजी यांनी या पुस्तकात दिली आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे हे संस्कार आहेत. ते विधीपूर्वक केले जातात. श्रवण सुरू झाला की व्रतवैकल्ये सुरू होतात

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language